पीएनपी महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी विषयावर मार्गदर्शन

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वेश्वी, अलिबाग येथे सायबर सिक्युरिटी या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा उद्देश डिजिटल युगातील सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणे हा होता. या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर व वक्ते म्हणून अनेक वर्षे सायबर सिक्युरिटी क्षेत्रामध्ये संशोधन करणारे तज्ज्ञ कुमार गौरव यांनी महाविद्यालयातील शिक्षकांना मार्गदर्शनपर प्रशिक्षण दिले. त्यांनी सायबर सिक्युरिटी संदर्भात उपयुक्त माहिती व व्यावहारिक अनुभव प्रेझेंटेशनद्वारे प्राध्यापकांसमोर मांडले. त्यांनी केलेले मार्गदर्शन सर्वांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक ठरले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सायबर जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले तसेच आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमांकरिता महाविद्यालयातील डॉ. नम्रता पाटील, डॉ. रसिका म्हात्रे, प्रा. पूजा म्हात्रे, प्रा. वृषाली घरत, डॉ. अमृता कुमारी शुक्ला आधी विभाग प्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. कैलाससिंह राजपूत यांनी मानले.

Exit mobile version