| पनवेल | प्रतिनिधी |
इंनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनच्या वतीने क्लबच्या वुई केअर या घोषवाक्यांतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मार्केटयार्ड शाळेतील विद्यार्थ्यांना हँड वॉशिंग बाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. हाताची स्वच्छता न ठेवल्यास होणार्या आजाराबाबत विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आले.
इंनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊन च्या वतीने शाळेस दोन मोठे फलक, लिक्वीड सोप, वीस गरजू मुलांना शूज,पाच कार्यालयीन टेबल व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री प्रक्षाले, शिक्षक वर्ग यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासइंनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनच्या अध्यक्षा कल्पना नागांवकर, सई पश्रलवनकर, शुभांगी वालेकर, प्रतिभा लादे, शितल गायकवाड, सोनाली परमार ुपस्थित होते.