ठाकरे, शिंदे गटांचे दसरा मेळावे
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईत बुधवारी ( 5 ऑक्टोबर) दोन दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचा पहिलाच मेळावा बीकेसीच्या मैदानावर होणार आहे. या मेळाव्यांकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूंकडून मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
सत्तांतरानंतर प्रथमच हे दोन मेळावे होत असल्याने दोन्ही बाजूकडून परस्परांवर आरोप, प्रत्यारोपांच्या फैर्या झडणार हे निश्चित. पण त्यावरुन राजकीय वातावरण आणखी तप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.