प्रेम प्रकरणावरुन पत्नीचा छळ; पोलीस कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा

| पेण | प्रतिनिधी |

प्रेम प्रकरणावरुन पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ केल्याच्या कारणावरुन एका पोलीस कर्मचार्‍यासह त्याची प्रेयसी तसेच प्रेयसीचा नवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुजीत पाटील, त्याची मैत्रीण प्रज्ञा अमर पाटील, तिचा नवरा अमर सुरेश पाटील अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

यातील पिडीत महिला राहणार म्हाडा कॉलनी हिने 13 मे 2019 ला सुजीत पाटील याच्याबरोबर विवाह केला होता. एक वर्षाचा सुखी संसार झाल्यानंतर डिसेंबर 2020 ला सुजीत पाटील याच्या स्टेट्सवर त्याच्या मैत्रिणीचा फोटो होता आणि त्याखाली मिस यु बेबी लिहिले होते. त्याच दिवशी पिडीत महिलेने आपल्या पतीला विचारणा केली असता त्यानी उडवाउडवीचे उत्तरे देऊनन सांगितले की, ती माझ्यासोबत जिममध्ये असते, आपल्या मुलीचा फोटो टाकण्याच्या ऐवजी चुकून तिचा फोटो स्टेट्सवर पडला आहे. तेव्हापासून या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. यातील पिडीत महिलेचा पोलीस नवरा वेळोवळी तिला चुकीची माहिती देऊन मिसगाईड करत होता. परंतु, ज्यावेळेला या पिडीत महिलेला आपला नवरा फसवत आहे याची खात्री झाल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद वाढत जायला लागला. त्यावर पिडीत महिलेच्या नवर्‍याने मैत्रिणीच्या नवर्‍याबरोबर तुझे प्रेमसंबंध आहेत, असा संशय घेत तो पत्नीला त्रास देऊ लागला. तसेच तिला आत्महत्या करण्याची धमकी सुध्दा देऊ लागला. पिडीत महिलेकडून स्टॅम्प पेपर वर लिहून घेणे, तिचे केस कापणे असे प्रकार झाले. या सर्व व्यापाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदविली आहे. याबाबत पेण पोलीस ठाणे अधिक चौकशी करत आहेत.

Exit mobile version