बारावीच्या अभ्यासानं घेतला रेवदंड्यातील मुलाचा जीव
। रेवदंडा । महेंद्र खैरे ।
अभ्यासाकरीता पुस्तके नसल्याचे इयत्ता 12 वी परिक्षेच्या तणावाने रेवदंडा साखळेवाडीत सतरा वर्षीय अल्पवयीन विदयार्थ्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. परिक्षेच्या तणावात कल्पेश जैन यांने शुक्रवारी (दि. 25) सायकांळी साडेसात वाजण्याचे सुमारास रेवदंडा साखळेवाडी येथील राहत्या घरात आत्महत्या केली.
रेवदंड्यात लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे त्यांच्या वडिलांना पुस्तके खरेदी करणे शक्य झाले नाही. अभ्यासाकरीता पुस्तके नाहीत म्हणून त्या मुलाने आत्ममहत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. रेवदंडा साखळेवाडी येथील हिम्मतलाल जैन यांचा सतरा वर्षीय मुलगा कल्पेश जैन इयत्ता बारावीमध्ये शिकत होता. काही दिवसांवर इयत्ता 12 वी परिक्षा होती. अभ्यासासाठी लागणारी पुस्तके त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे अभ्यास कसा होणार, या तणावाखाली तो होता. यावेळी त्याच्या वडिलांनी लॉकडाऊननंतर बाजारपेठ खुली झाल्यावर पुस्तके खरेदी करू, असे सांगितले.
रेवदंडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मुत्यू म्हणून करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस सहाय्यक फौजदार सरिता गोसावी अधिक तपास करत आहेत.