मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
। मुरूड । वार्ताहर ।
आधुनिक युगात प्रसारमाध्यमांद्वारे माणूस जरी जवळ येत असला तरीही या माध्यमांचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार मुरूडमध्ये राहणार्या फिर्यादी व पिडीत अल्पवयीन मुली व काही महिलांसोबत घडला आहे. दि.17 नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपीत यांनी इंन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगचा वापर करुन बोगस इंन्स्टाग्राम अकाउंट तयार करुन यांतील महिला फिर्यादी रा.विहूर मुरुड तसेच साक्षीदार पिडीत मुली यांना सदर अकाउंड वरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली असता सदरची फेंन्ड रिक्वेस्ट फिर्यादी व साक्षीदार पिडीत मुली यांनी न स्विकारता सदरचे अकाउंट ब्लॉक केले असता सदर अनोळखी आरोपीत याने इंन्स्टाग्राम ग्रुप तयार करुन त्यामध्ये फिर्यादी व साक्षीदार पिडीत मुली त्यातील काही मुली या अल्पवयीन असताना त्यांना त्यांचे संमतीशिवाय ग्रुपमध्ये अँड करुन सदर ग्रुपवर अश्लिल मसेज व स्त्री पुरुषांचे शारीरीर संबधाचे फोटो पाठवून फिर्यादी व साक्षीदार व पीडीत मुली यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्णन केले. याबाबत मुरुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोनि/श्री.कांबळे हे करीत आहेत.