आपटवणे शाळेत आरोग्य विषयक जनजागृती

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील राजीप शाळा आपटवणे येथे दि प्राईड इंडिया या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक जनजागृती व्हावी त्यांना आरोग्याचे महत्त्व कळावे आणि आरोग्याची गोडी लागावी या उद्देशाने हायजेनिक कीटचे नुकतेच वाटप केले. तसेच ग्रामस्थ व पालकांसाठी मजबूत आणि टिकाऊ जम्बो पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

घरात व गावात होणारा कचरा या पिशवीत टाकल्याने घर व गाव स्वच्छ राहील. आणि ग्रामस्थांना स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करता येईल हा यामागील उद्देश होता. या कार्यक्रमाला आपटवणे सरपंच शरद चोरघे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैशाली केदारी, सदस्या नेहा भिसे, मयुरी दंत व सारिका दंत उपस्थित होत्या. शिक्षक राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर मुख्याध्यापिका प्रमिला म्हात्रे यांनी शाळा विकासात भरीव योगदान दिल्याबद्दल दि प्राईड इंडिया संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर वसंत मोरे आणि रजनी राऊत यांचे आभार मानले.

Exit mobile version