इनरव्हीलतर्फे अंगणवाडी बालकांची आरोग्य तपासणी

। पनवेल । वार्ताहर ।
अजिवली प्राथमिक केंद्र येथे इनरव्हील क्लब ऑफ पनवेल औद्योगिक वसाहत यांच्या सौजन्याने अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा कल्पना नागावकर, डॉ. जयश्री पाटील,अर्चना फके, अ‍ॅड शिल्पा नागावकर, डॉ. राजेश्री बागड,डॉ. पंकज भिसे,डॉ.नीलिमा भांडारकर यांच्या उपस्थितीत बालआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

बालआरोग्य तपासणी शिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील नखाते, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड उपस्थित होते. डॉ.प्रभाकर पाटील आणि डॉ.विजया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला आरोग्य कर्मचारी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प कर्मचारी यांनी सहकार्य केले. या शिबिरात 82 मुलांची आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले आणि मुलांना प्रोटीनयुक्त आहार (खाऊ) वाटप करण्यात आले.

Exit mobile version