| पनवेल । वार्ताहर ।
रयत शिक्षण संस्था मार्केट यार्ड पनवेल येथे इनर व्हील क्लब पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनच्यावतीने पौगंडावस्थेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व शारीरिक स्वछतेबाबत काळजी घेण्याबाबत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. क्लबच्या डॉ. मनीषा कांबळे व डॉ. राजश्री बागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुमारे 150 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. साधना गांधी यांनी सामान्य ज्ञान विषयची पुस्तके मुलांना भेट दिली. यावेळी शाळेचे प्राचार्य प्रक्षाळे, प्रतिभा लादे, कल्पना नश्रगावकर, सई पालवनकर, शुभांगी वाळेकर, डॉ. साधना गांधी, वृषाली सावळेकर, रेखा कांडपिळे, डॉ. जयश्री पाटील,ज्योती गुंदेचा, वैशाली ठाकरे, मोहिका भुजबळ शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
पौगंडावस्थेतील मुलींना आरोग्य प्रशिक्षण
