दिघी पोर्टची अवजड मालवाहतूक डोकेदुखीच

नागरिक,प्रवाशांची कारवाईची मागणी
| म्हसळा | वार्ताहर |
दिघी पोर्टच्या अवजड वाहनांमधून कोळसा,विविध प्रकारचे रसायन, तेळ, डांबर आदी ज्वलनशील पदार्थ आणि विविध यंत्रसामुग्री वाहतूक करणार्‍या ओव्हर लोड परिसरातील नागरिक आणि अन्य वाहनचालकांसाठी डोकेदुखीच ठरु लागली आहे. दिघी ते माणगाव पर्यंतचा 60 किमी अंतराचा पल्ला गाठण्यासाठी त्या – त्या वाहनाची आणि गाडी चालकाना कसरतच करावी लागताना दिसत आहे. होत काही वाहनांची अवजड माल वाहतूक करण्याची क्षमता 20 ते 25 टन इतकी असताना 30 ते 45 टन माल भरून माल वाहतूक होत असताना पहायला मिळत आहे.अशामुळे गाडीचा ब्रेक फेल होणे, गिअरबॉक्स तुटणे,टायर पंक्चर होणे किंवा टायर फुटणे,गाडीला झोला मारणे असे अनेक प्रकारची नादुरुस्ती होऊन अपघात होण्याच्या सर्रास घटना दिघी पोर्ट कार्यान्वीत झाले पासुन घडत आहेत.

आरटीओचे दुर्लक्ष
हे जरी नित्याचेच झाले असले तरी दिघी पोर्ट प्रशासनाने अवजड वाहतूक करणार्‍या वाहनांची माल वाहतूक करण्याची क्षमता ठरल्या प्रमाणे गाडीत माल लोड करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या वाहतुकीवर आर.टी.ओ.पेण विभाग आणि संबंधित पोलिस यंत्रणेने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे मात्र तसे होत नसल्याचे दिसून येत आहे.

दिघी पोर्टमधून अवजड मालवाहतूक करणार्‍या वाहनांना प्रथम दिघी, हरवित घाट चढाव, घोणसे घाट चढाव,साई मोर्बा घाट उतार आणि म्हसळा शहर बायपास उतार वळणावर मोठी कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी कमी रुंदीचा तर अनेक ठिकाणी अडवणूक करून ठेवलेल्या रस्त्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने अपघाताच्या व वाहन नादुरूस्त होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.हया घटना आम नागरिकांना आणि प्रवासी वर्गासाठी धोक्याची घंटा असून या पुढे यात अधिकच भर पडणार आहे.म्हसळा घोणसे घाटात दिघी पोर्ट मधुन ओव्हर लोड माल वाहतूक करणारी वाहने गाडीची माल वाहतूक करण्याची क्षमता नसल्याने अपघाती पवनक्षेत्र असलेल्या ठिकाणी आपोआप बंद पडतात आणि दुर्घटना घडण्यास कारणीभूत ठरत आहेत.

म्हसळा ते माणगाव सुखाचा प्रवास करायचा असेल तर प्रवाशी,पर्यटक किंवा मालवाहतूक करणारी वाहने मर्यादित वेगात सावकाश चालवणे गरजेचे आहे.ज्यांनी गाडीची क्षमता आणि वेग मर्यादा पाळली नाही त्याची घाई नक्कीच संकटात जाई हे नित्यातेच ठरलेले आहे त्या साठी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत .

– महादेव पाटील,माजी सभापती म्हसळा
Exit mobile version