तर आतापर्यंत एकूण ६३४ मि. मि. पाऊस
। मुरूड । वार्ताहर ।
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हुलकावणी देत अखेर उशीरा सुरुवात केली असली तरी मुरुडमध्ये सलग चार दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुरुड मध्ये १०४ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे तर एकूण आतापर्यंत मुरुडमध्ये ६३४ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे.
सतत होणारे हवामानातील बदल यामुळे सुरुवातीपासून मान्सून हुलकावणी देत होता. मुरुड मध्ये दिवसा कडकडीत ऊन पडत असे तर रात्रीच्या वेळी वरून राजा हजेरी लावत असे. त्यामुळे मुरुड मधील शेतकरी चिंतेत होते. दिवसभर कडकडीत उन असल्याकारणाने पेरलेले पीक वाया जाते की काय असे वाटत होते. दिवसभर कडकडीत उन असल्या कारणाने उष्णता सहन होत नव्हती. हळूहळू पावसाची रिपरिप वाढू लागली व वातावरणातील उष्णता कमी होऊ लागली. त्यामुळे मुरुडकरांना अखेर उष्णतेपासून दिलासा मिळाला. आणि या पावसाने दमदार सुरुवात केल्याने बळीराजाही सुखावला आहे.दमदार पावसामुळे भाताच्या रोपांना जिवदान मिळाले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.