| बंगळुरु | वृत्तसंस्था |
इस्लाममध्ये हिजाब परिधान करणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, असा निर्वाळा देत कर्नाटक उच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांमधील हिजाबबंदी वैध असल्याचा निकाल मंगळवारी दिला. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीने सुनावणी करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे.. ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निकालासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर भाष्यही केलंय.
हेगडे यांनी दाखल केलेली याचिकेपूर्वीच काही मुस्लीम विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. हा निकाल घटनाविरोधी असल्याचा दावा ङ्गकॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाफ या विद्यार्थी संघटनेने केलाय. दरम्यान, या सर्व याचिका सुनावणीसाठी न्यायालयाच्या पटलावर आणण्यासंदर्भात होळीच्या सुट्टीनंतर निर्णय घेतली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय.