। मुंबई । दिलीप जाधव ।
दक्षिण रायगडातील लोणेरे, माणगाव, तळा, श्रीवर्धन व म्हसळा शहरांमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास रोहे, महाड एमआयडीसीतील अग्निशमन केंद्राला बोलवावे लागते त्यामुळे सदर ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यन्वित कधी करणार असा प्रश्न आम.जयंत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत उपस्थित केला.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, श्रीवर्धन नगरपरिषदेकडे अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असून माणगाव, तळा व म्हसळा या नवनिर्मित नगर पंचायतींकडे अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. या परिसरात आगीची दुर्घटना घडल्यास जवळपासच्या उपलब्ध अग्निशमन सेवेची मदत घ्यावी लागत.राज्यातील ड वर्ग महानगरपालिका सर्व नगरपरिषदा नगरपंचायती यांची अग्निशमन सेवा सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालया मार्फत संबंधीत नगर परिषदा नगरपंचायती यांचेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल मागविण्यात आले आहे .
सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर अशा ठिकाणी अग्निशमन सेवा प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे नियोजन असल्याचे महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने कळविले असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे .