| मुंबई | प्रतिनिधी |
दिशा सालीयान प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे याना मालवणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.यू. बघेले यांनी निर्णय दिला आहे. दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप राणे पिता-पुत्रांनी केला होता. त्यानंतर दिशा सालीयानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. दिशा सालीयान सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती .दिशा सालीयन संदर्भात आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी दोघांवर मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.