टीएमसी कॉलेजमध्ये एचआयव्ही तपासणी शिबिर

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव येथील जे.बी.सावंत एज्युकेशन सोसायटीचे टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजमध्ये एड्स जनजागृती सप्ताहनिमित्त शुक्रवार दि.3 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व डी. एफ. एफ. ई. विभागांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची एच.आय. व्ही.तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले,सौ.खेडेकर,सौ.राजपूत, संस्थेचे नानासाहेब सावंत,रामदास पुराणिक, डॉ.संध्या कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.हर्षल जोशी, प्रा. डॉ. माळी, प्रा.पवार, अमित बाकाडे,विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. एच.आय.व्ही तपासणीसाठी 50 विद्यार्थी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जोशी यांनी केले तर या कार्यक्रमासाठी अमित बाकाडे व सर्व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version