। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील ग्रामपंचायत काराव-गडब येथे सरपंच अर्पणा कोठेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रतिभा कोठेकर, ग्रामसेविका आर.एस. धनावडे, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
गडब येथील राजिप प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका रंजना घरत यांच्या हस्ते,जनता हायस्कुल गडब येथे मुख्याध्यापिका करुणा मोकल यांच्या हस्ते, काळंबादेवी युवक मंडळ व्यायामशाळेत निवृत्त शिक्षक एस.वाय. लांगी यांच्या हस्ते, संस्कार विद्यालयात अध्यक्ष संजय चवरकर यांच्या, तर प्राथमिक आरोग्य केंद्र गडब येथे डॉ. संजय गागुर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
गडब येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण
