। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगर पालिकेने लावलेल्या अन्यायकारक मालमत्ता कराची झळ सर्वसामान्य जनतेला बसत असून नागरिकांची होणारी होरपळ लक्षात घेऊन कामोठेमध्ये सर्वात प्रथम पालिका विरुद्ध मुक मोर्चा काढण्यात आला. पण पालिके मधील सत्ताधारी नागरिकांना जुमानत नाहीत. याचाच रोष होळीला देखील दिसून आला. जनतेचा आक्रोश शेतकरी कामगार पक्षाने मालमत्ता कराची होळी साजरी करून व्यक्त करण्यात आला.
यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, प्रमुख संघटक अल्पेश माने, महिला अध्यक्ष उषा झणझणे, लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष कुणाल भिंडे आदी पदाधिकार्यांनी यासाठी मेहनत घेतली आणि नागरिकांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला.