। पनवेल । प्रतिनिधी ।
पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणार्या तोतया पोलिसास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले. तो रायगड येथे होमगार्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे.
श्लोक म्हात्रे हा त्याच्या मित्रासह सिकेटी कॉलेजजवळ असताना एक खाकी कलरची पॅन्ट व शर्ट घातलेला एक इसम त्याच्याजवळ आला. त्याने आपण पोलीस असल्याचे सांगून वडाळे तलाव येथे काही मुलांनी भांडण केले आहे व ते पेणचे आहेत, असे सांगून त्याने माझ्या बरोबर पनवेल शहर पोलीस ठाणे येथे चल असे सांगून त्याला बरोबर घेतले व त्याला त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन ज्याची किंमती जवळपास 70 हजार रुपये इतकी आहे. ती काढण्यास सांगून ती हिसकावून तो पसार झाला होता. पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी रायगड परिसरात लपला असल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने रोहित भोसले याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता अशा प्रकारचा गुन्हा खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा केल्याचे निष्पन्न झाले.