रोठ बु.ग्रा.पं.चा जि.परिषदेतर्फे सन्मान

। खांब-रोहा । वार्ताहर ।
स्वच्छतेबाबत एक पाऊल पुढे टाकत रोहे तालुक्यातील रोठ बु.ग्रा.पंचायतीने ग्रामपंचायत स्तरांवर केलेल्या कामगिरीची दखल घेऊन, जिल्हा परिषदेतर्फे त्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन या राष्ट्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. तसेच स्वच्छता अभियानात विविध प्रकारचे उपक्रम राबवून गाव स्वच्छ, सुंदर व आदर्श केले आहे. आदर्श सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून पर्यावरण रक्षणासाठी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दरम्यान, ग्रा.पंचायतीस मिळालेल्या पुरस्काराबाबत समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.

स्वच्छता व पाणी व्यवस्थापन याबाबत केलेल्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामपंचायतीचा केलेला विशेष गौरव हा भविष्यात देखील असाच टिकून राहिल.

– नितीन वारंगे, सरपंच
Exit mobile version