। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्या महिलांना ङ्गभारत बदलणा-या महिलाफ या पुरस्काराने निती आयोगातर्फे सोमवारी सायंकाळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या 11 महिलांचा समावेश होता. देशातील एकूण 75 महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
निती आयोगच्यावतीने ङ्गभारत बदलणार्या महिला या 5 व्या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे विविध क्षेत्रातील प्रशसंनीय कार्य करणार्या 75 महिलांना गौरविण्यात आले. याप्रसंगी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, सल्लागार अण्णा राय तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वरूप मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले. डॉ. अर्पणा हेगडे, दिपा चौरे , चेतना गाला सिन्हा,मेहा लाहीरी , प्रेमा गोपालन,सायली मराठे , शांती राघवन ,शाहीन मिस्त्री ,सुलज्जा मोटवानी आदींचा सन्मान करण्यात आला तर किर्ती पुनिया यांनाही सन्मानित करण्यात आले मात्र, याही कार्यक्रमात उपस्थित होऊ शकल्या नाहीत.