| अलिबाग | प्रतिनिधी |
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त अलिबाग फोटोग्राफर्स अॅड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्यावतीने ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत उर्फ़ दादा नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खजिनदार जितेंद्र मेहता, माजी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय नाईक, अध्यक्ष समीर मालोदे, उपाध्यक्ष तुषार थळे, खजिनदार राकेश दर्पे, सल्लागार सुरेश खडपे, वामन पाटिल, सदस्य विवेक पाटील, विकास पाटिल, मिलिंद भालवणकर, उपस्थित होते.दादा नाईक गेली 40 वर्षे फोटोग्राफी क्षेत्रात काम करत आहेत.
दरवर्षी अलिबाग फोटोग्राफी असोसिएशन या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, वह्या वाटप, दहावी, बारावीत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर असे विविध कार्यक्रम घेऊन जागतीक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो.