। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांना नुकताच उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्ताने त्यांचा अलिबागमध्ये विविध संस्था, संघटनांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
शहाबाज येथे नुकताच वार्षिक अधिवेशन झाले. या अधिवेशनानिमित्ताने रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने ज्योती म्हात्रे यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कर देऊन नुकताच सन्मान करण्यात आला होता. ज्योती म्हात्रे या प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या ग्रंथपाल म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्यांना उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
अलिबागमध्ये काही दिवसांपूर्वी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने ज्योती म्हात्रे यांचा वेगवेगळ्या संस्था संघटनाच्यावतीन सन्मान करण्यात आला. अलिबागमधील आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांच्या मार्फतदेखील ज्योती म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. तसेच, अलिबागमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त ज्योती म्हात्रे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.