गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

। खेड । प्रतिनिधी ।
तालुक्यातील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील जेईई अ‍ॅडव्हान्स, नीट, जेईई आर्की., सीए फाऊंडेशन, सीएस फाऊंडेशन व एमएचटी सीईटी या परिक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यामध्ये वाणिज्य शाखेतील शुभम भोसले, आदित्य गाडगीळ, विश्‍वा चुरी, मुग्धा मेहता, इक्रा परकार, समृध्दी कांबळे, अथर्व चव्हाण, श्रेया शिंदे, अमूल्या कोटेरा, आकाश भंडारी, सानिया शेट, आर्यन चौगले, दक्ष खेडेकर, हर्ष बेंडखळे, प्रतिक्षा येरुणकर, श्रेया बागडे, आदिती पारखी, ऋतुजा पवार, निधी बुटाला, मधुरा बोंडले, अथर्व पाटील, अर्निशा मोरे, सिमरन चव्हाण, नेहा मेहता, स्नेहल छपरे यांसहित नीट परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी अद्वैत भोसले, श्रावणी पार्टी, यश गांगल, अय्युब चौगुले, अमेय मोरे, सानिया मेमन, धनश्री गवाणकर, मुक्ताई धामणस्कर, पूजा रजपूत, प्रेरणा गुजर, आदित्य पोंक्षे, श्रध्दा खेडेकर, श्रुती यादव, सोनाली घैसास तसेच जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी मोहम्मद कादिरी, रविराज शेलार, अरुण सुरेश, सुयश कर्नाड, वेदांत जाधव, निर्भय तांबे, फुरकान खतीब, मनस्वी कांबळे व सोहम कांबळी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, खेड पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, रोटरी स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ. अनिल जोशी, रोटरी प्रतिष्ठानचे सचिव पराग चिखले, मंदार संसारे, विश्‍वास पाटणे, उमेश संसारे, सचिन करवा, जोगेश साडविलकर, संदिप नायकवडी, लक्ष्मीकांत पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version