कर्तुत्वाच्या ‘सावलीचा’ संकल्पकडून सन्मान

| पनवेल | वार्ताहर |

21 व्या शतकामध्येही पुरुषप्रधान आणि पितृसत्ताक संस्कृती प्रचलित आहे. परंतु, जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींनी स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करून सर्व क्षेत्र पादाक्रांत केले आहेत. ते करत असताना यशस्वी पुरुषाला एक स्त्रीच यशाचे शिखर गाठण्यासाठी पाठबळ देते. त्याच्या सुखदुःखात आणि अडचणीच्या काळामध्ये खंबीरपणे साथ देते. अशा कर्तुत्वाच्या ‘सावलीचा’ सन्मान करून वैशाली जगदाळे यांनी आपल्या संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनोखा महिला दिन रविवारी साजरा केला. या माध्यमातून त्यांनी समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष विनोद साबळे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, लायन ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष बाळू फडके, सहसचिव अमर वामन, माजी नगरसेविका नीता माळी, सुदेशना गुप्ता, मानसी पोळ , शर्वरी सावंत, सपना सावंत, स्वप्निल काटकर, अतिश साबळे, प्रिया फडके, सुषमा मयेकर उपस्थित होते. मनीषा काटकर ,संगीता साबळे, रंजिता मेहत्रे, सायली सरक, नमिता गांगरे, शुभांगी घायाळ, बालाजी घुमे, आश्‍विनी काकडे या गौरवमूर्ती होत्या. अनेक समारंभ त्याचबरोबर पुरस्कार आणि सन्मान कार्यक्रमांमध्ये यशस्वी पती बरोबर पत्नीलाही व्यासपीठावर निमंत्रित केले जाते. त्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे खंबीरपणे साथ देणार्‍या पत्नीचा संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आले. या गुणगौरवाचे साक्षीदार होण्यासाठी सन्मान मूर्तींच्या पतीलाही आयोजकांनी निमंत्रित केले होते.

Exit mobile version