होराळे-वावोशीत शस्त्रक्रिया शिबिर

। रसायनी । वार्ताहर ।
विठ्ठल रखुमाई देवस्थान होराळे- वावोशी येथे मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शत्रक्रीया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे मुख्य मार्गदर्शन रो. उमाताई मुंढे यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे शिबीर यशस्वी रित्या पार पडले. शिबिरात 96 ओपीडी व 15 मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरासाठी आपटी गावच्या समाजसेविका श्‍वेता ताई मनवे, ह.भ.प.दिलीप पाटील व देवस्थानचे संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी गणेश काळे, संदिप साबळे, शारदा काळे, वर्षा पाटील, बाळकृष्ण होनावळे, शशिकांत शानभाग, धनंजय गीध, अनुराधा होनावळे, रोहन गावडे, समृद्ध उचिल व सुजित मोहनदास यांची उपस्थिती व मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version