रोहा | प्रतिनिधी |
पाच वर्षांची मुलगी अंगणात खेळत असताना राकेश उमाजी शिर्के या नराधमाने तिला घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अंगणात खेळत असलेली मुलगी दिसून येत नसल्याने तिच्या आजी आजोबांनी शोध घेतला असता हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. आरोपी रोहा येथील पार्टे चाळीत राहत आहे.पोलीस पुढील तपास करत असून पिडीत मुलीला अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.