कैर्‍या खरेदीसाठी गृहिणींची लगबग

| पनवेल | वार्ताहर |

पावसाळा सुरु होण्यापूर्वी आंब्याच्या कच्च्या कैर्‍या घेऊन ठेवणीतील लोणचे बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे बाजारात कच्चा कैर्‍यांच्या मागणीत वाढ होते. मागणीत वाढ झाल्याने कच्चा कैर्‍यांची आवकदेखील वाढली आहे.

उन्हाळा सुरू होताच एप्रिल-मे महिन्यात बाजारात कच्या कैर्‍या दाखल होण्यास सुरुवात होते. एप्रिलमध्ये कमी प्रमाणात कच्च्या कैर्‍यांची आवक होत असते. मात्र, मे महिन्यामध्ये कच्च्या कैर्‍यांची आवक वाढण्यास सुरुवात होते. सध्या बाजारात निलम, तोतापुरी जातीच्या कच्च्या कैर्‍या दाखल झाल्या आहे. कच्च्या कैर्‍यांचे घाऊकमध्ये प्रतिकिलो 24-40 रुपये दर आहेत. तर किरकोळ बाजारात 60-80 रुपयांनी कच्च्या कैर्‍यांची विक्री केली जात आहे. महाराष्ट्रसह दक्षिण भारत, गुजरातमधून कच्च्या कैर्‍यांची आवक होत असते. बाजारात दाखल होणार्‍या कैर्‍या चवीला आंबट असून, लोणचे आणि पन्हे बनविण्यासाठी अधिक मागणी होत आहे. पुढील काही दिवसात कैर्‍यांच्या मागणीत आणखी वाढ होणार असल्याचा अंदाजा व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version