। रेवदंडा । प्रतिनिधी ।
स्पाईस रेस्टॉरंन्ट आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्याचा मोठा प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरास युवावर्गासह महिला वर्गानी सुध्दा रक्तदान केले. तर संदेश बेडेकर यांनी 99 वेळा रक्तदान करण्याचा बहूमान घेतला.
चौल येथे स्पाईस रेस्टॉरंन्टच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवार दि. 4 नोव्हेबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.00 चे दरम्यान करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते व शिवसेना उध्दव ठाकरे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांचे शुभहस्ते करण्यात आले. प्रसंगी चौल ग्रा.प. माजी उपसरपंच अजीत गुरव, मारूती भगत, अशोक नाईक, शैलेश घरत, राजेंद्र गुरव, दिपेश पाटील, अमित मानकर, अमोल कंटक, अक्षय नाईक, संदेश गायकर, कल्पेश खारकर, संदेश बेडेकर, ओमकार नागावकर आदी मंडळीची उपस्थिती होती.
या रक्तदान शिबिराचा प्रारंभ शिवसेना उध्दव ठाकरे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांचे शिवप्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून व दिपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने युवावर्ग तसेच महिलावर्गाने रक्तदान करून प्रतिसाद दिला. तर संदेश बेडेकर यांनी 99 व्यांदा रक्तदान केले. यावेळी स्पाईस रेस्टॉरंटचे केदार मळेकर व सिध्दी मळेकर यांचे वतीने सुरेंद्र म्हात्रे, अजीत गुरव, मारूती भगत, संदेश बेडेकर, अशोक नाईक, आदीचा पुष्पगुच्छ प्रदान करून यथोचीत सत्कार केला. तसेच मान्यवरांचे हस्ते रक्तदात्याना पुष्पगूच्छ प्रदान करून त्यांना रक्तदानाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या वतीने रक्त संक्रमण अधिकारी डाँ दिपक गोसावी, समाजसेवा अधिक्षक नवनाथ अक्वी, अधिपारिचारक वैभव कांबळी, विशाल भगत, रामकुमार निकस, गणेश भोये, मंगेश पिंगळा, महेश घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.





