जिल्ह्यात एकता दौडला उदंड प्रतिसाद

जेएएस रायगडच्या माध्यमातून एकता दौड

| अलिबाग । वार्ताहर ।

जिल्ह्यातील जेएसएस रायगडच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी सहकार्यातून जिल्ह्यात एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रशिक्षणार्थ्यांना व ग्रामस्थांना एकतेची शपथ देण्यात आली.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, डॉ. नितीन गांधी, गीतांजली ओक, विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंर्तर्गत स्वच्छता कार्यक्रम राबविले जातात. या प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक विजय कोकणे, प्रतिक्षा चव्हाण, सुकन्या नांदगावकर, कल्पना म्हात्रे, अजय पाटील, नवनाथ पोईलकर, भरती पोईलकर, हिमांशू भालकर, स्वराज नाईक, पियूष पाटील, तन्वी पाटील, प्रांजल पाटील हे उपस्थित होते.

मुरुडमध्ये राष्ट्रीय एकता दिवस निमित्त रॅली

| आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरुड जंजिरा नगरपरिषद कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यालयीन प्रशासिक अधिकारी परेश कुंभार व नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर कार्यालयीन प्रांगणात राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ ग्रहण करण्यात आली. शपथीचे वाचन प्रशासनिक कार्यालयीन अधिकारी कुंभार यांनी केले. शहरातील मुख्य बाजारपेठेत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, शिक्षक, नागरिक एकत्र येऊन रॅली काढण्यात आली.

या रॅलीत नायब तहसीलदार गोविद कोटंबे, नरेंद्र नांदगावकर, दिपाली दिवेकर, कपिल वेहेले, प्रशांत दिवेकर, संजय वेटकोळी, प्रकाश आरेकर, सतेज निमकर, मनोज पुलेकर, सुदेश माळी, श्रावणी भायदे, सतिष जंजिरकर, जयेश चोडणेकर, प्रणाली करडे, नम्रता करडे, स्वप्नजा विरुकुड, प्रजोल गुरव, अभिजित कारभारी, स्मिता मुरूडकर, महेंद्र हावरे, संध्या नागे, अविनाश ठाकूर, दिप्ती एरंडे, उत्कर्षा रणदिवे, प्रविणा भोईनकर , प्रेरणा चौलकर, अक्षता भोईर, उझमा उलडे, राधिका सुर्वे, रुपेश भाटकर, मितेश माळी, मंगल मुलेकर, शिंदे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

म्हसळ्यात एकता दौड

| म्हसळा । वार्ताहर ।

राष्ट्रीय एकता दिवस ही एक लोकप्रिय चळवळ व्हावी, या उद्देशाने म्हसळा तालुक्यात विविध उपक्रम राबविले. त्यात एकतेसाठी रन फॉर युनिटी आयोजित केली होती. म्हसळा शहरात जान्हवी करडे पेट्रोल पंप येथून अंजुमन हायस्कूल पर्यंत म्हसळा तहसिल, पोलिस ठाणे, नगर पंचायत, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी आणि शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग घेत एकता दौड संपन्न झाली.

सांगता समारंभाला राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. एकता दौड मध्ये निवासी नायब तहसीलदार जे.एम.तेलंगे, पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, मंगेश साळी, संजय खांबेटे,डी. एन. दिघीकर, शाहिद जंजिरकर, सरोज म्हशिलकर, करण गायकवाड, मंगेश म्हशिलकर, दिपल मुंडये,प्रशांत करडे, दिपाली चव्हाण, संतोष कुडेकर, समीर दिवेकर आदी उपस्थित होते.

मोटार सायकल रॅलीचे आयोजन

| पनवेल । वार्ताहर ।

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत तळोजा 102 शीघ्र कृती दलाच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सरदार वल्लभभाई जयंती निमित्त भारतभर 31 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय एकता दिवस आयोजित करण्यात आला आहे. शनिवार (ता. 29) रोजी रन फॉर युनिटी अभियानाच्या माध्यमातून 102 शीघ्र कृती दलाच्या वतीने खारघरमध्ये मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शीघ्र कृती दलाचे वरिष्ठ अधिकारी प्रेम कुमार यांच्या मार्गदर्शननुसार नवी मुंबई परिसरात 60 कि.मी. मोटरसायकल रॅली संपन्न झाली. या रॅलीत 300 जवान सहभागी झाले होते.

तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रिय एकता दिनाचे औचित्य साधून पनवेल पालिका पेशवे कालीन वडाले सरोवर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या स्वच्छता दूत पालिका अधिकारी वर्ग तसेच पनवेल सहभागी झाले.

Exit mobile version