| पनवेल | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य जीवन्नोनती उमेद अभियानांतर्गत पनवेलमधील वडघर प्रभागातील यशोदीप प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. महिलांच्या सबलीकरणासाठी सरकारने बचत गटांची संकल्पना अस्तित्वात आणली व या माध्यमातून विविध उपक्रम, विविध आर्थिक योजनांचा लाभ महिलांना मिळू लागला. हळूहळू या अभियानाची व्याप्ती वाढत असून, जास्तीत जास्त महिला या अभियानात जोडल्या जात आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पनवेल तालुक्यातील वडघर प्रभाग होय.
काही महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या वडघर प्रभागामध्ये तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती व 21 गावांचा समावेश आहे. या प्रभागात एकूण 12 ग्रामसंघ असून, ग्रामसंघाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी संध्याकाळी (दि.7) अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बचतगटातील शेकडो महिला सभेसाठी उपस्थित होत्या.