पतीने केला पत्नीचा खून; आरोपीला अटक

| कोलाड | वार्ताहर |

घर बांधण्याकरीता घेतलेल्या कर्जाच्या वादातून नवऱ्याने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत खून केल्याची दुर्देवी घटना कोलाड-पाले खुर्द येथे घडली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार रविवारी डिसेंबर पहाटेच्या सुमारास वैभव राम ठाकूर (37) यांनी त्यांची पत्नी विद्या ठाकूर (33) यांच्यामध्ये घराच्या बांधकामाबाबत बोलणे सुरु होते. बांधकाम करण्यासाठी कर्जाचा विषय निघाला. याच वादातून त्यांच्यात भांडण झाले. वैभवने विद्यावर कोयत्याने वार केले. तिच्या कानावर तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यामध्ये तीचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीला ताब्यात घेत अटक केली.

Exit mobile version