अरे बापरे…Blood Pressureमुळे डोक्याला ताप झालाय ; घाबरू नका, हे आहेत Blood Pressure नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

| मुंबई | वृत्तसंस्था |
येत्या १७ मे या दिवशी उच्च रक्तदाब दिवस (world hypertension day) साजरा केला जाणार आहे. जगभरात १.१३ अब्ज लोकसंख्या उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. WHO च्या म्हणण्यानुसार ही संख्या जगभरातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश आहे. उच्च रक्तदाबाची लक्षणे सुरुवातीला दिसून येत नाहीत. या आजाराची औषधे एकदा सुरू झाली की आयुष्यभर त्यापासून सुटका होत नाही. ही औषधे घेणे ही एक चिंतेची बाब असते. त्यामुळे औषधे न घेता रक्तदाबापासून दिलासा कसा मिळेल याकडे आपण लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

खाली दिलेल्या गोष्टींचे नियमितपणे पालन करा :
आहारातून सोडियम कमी करा
सोडियम हे उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे आहारातून सोडियम कमी केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारेल आणि रक्तदाब ५ ते ६ mm/Hgपर्यंत कमी होईल. रोज २ हजार ३०० मिग्रॅपर्यंत सोडियमचे प्रमाण नियंत्रित ठेवा. यासाठी पाकिटबंद (processed food items) पदार्थ कमीत कमी खा आणि जेवणात मीठ घालण्याऐवजी मसाल्यांचा वापर जास्त करा.

नियमित व्यायाम
दर आठवड्याला १५० मिनिटे शारीरिक व्यायाम केल्याने रक्तदाब ५ ते ८ mm/Hgपर्यंत कमी करता येतो. चालणे, सायकल चालवणे, पोहणे, नृत्य अशा व्यायामांना प्राधान्य द्यावे. आठवड्यातून किमान दोन दिवस strength training घ्यावे.

योग्य आहार
साबुदाणे, फळे, भाज्या आणि low fat dairy products यांमुळे रक्तदाब ११ mm/Hgपर्यंत कमी करता येईल. आहारात पोटॅशिअम वाढवा. भाज्या आणि फळांमुळे मोठ्या प्रमाणावर पोटॅशिअम मिळते.

धूम्रपान सोडा
सिगारेट ओढल्यानंतर काही वेळ रक्तदाब वाढतो. धूम्रपान बंद केल्यास रक्तदाब सामान्य राहातो. तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.

ताण कमी करा
सर्वात आधी हे जाणून घ्या की तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टीचा ताण येतो. त्यानुसार तुमच्या आयुष्यात अनावश्यक गोष्टींवर नियंत्रण मिळवा. आपले छंद जोपासण्यासाठी वेळ काढा. रोज काही मिनिटे शांत बसून दीर्घ श्वास घेतल्यास ताण कमी होण्यास मदत होईल.

Exit mobile version