‘आय लव्ह खोपटे’ चमकते फ्रेमचे अनावरण

| उरण | वार्ताहर |
ग्रुप ग्रामपंचायत खोपटेच्या माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे यांच्या सौजन्याने खोपटे गावाचे आय लव्ह खोपटे नावाची चमकती फ्रेम खोपटे गावात दत्त मंदिर समोर लावण्यात आली. या कामाचा लोकार्पण सोहळा खोपटेच्या माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे यांच्या हस्ते रविवारी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विनोद म्हात्रे, बी.एन डाकी, कैलास म्हात्रे, विश्‍वनाथ पाटील, कमलाकर म्हात्रे,राजन पाटील, महेंद्र पाटील,डॉ. संजीव म्हात्रे, युवराज पाटील,सदस्या जागृती घरत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळ खोपटेचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version