| माथेरान । वार्ताहर ।
देशाच्या आर्थिक जडणघडणीत औद्योगिकतेचा व्यापक विस्तार, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा समावेश केला तरच राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकते, असे स्पष्टपणे जाणणारे दूरदृष्टी ठेवणारे उद्योगमहर्षी जमशेदजी टाटा याचे राष्ट्राच्या उभारणीसाठी असणारे योगदान व त्यांच्या कार्याचे विविध पैलू मांडणारे छायाचित्र-माहिती प्रदर्शन सध्या माथेरानमध्ये सुरू आहे. गुरुवार (दि.10) पर्यंत चालणार्या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांसह पर्यटक तसेच माथेरानकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. देशाच्या विविध मोठ्या शहरांमध्ये याअगोदर दहा प्रदर्शने आयोजित केली होती व 11 वे प्रदर्शन हे माथेरान मध्ये होत आहे.
माथेरान नगरपरिषद व टाटा सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भरवलेल्या प्रदर्शनात जमशेदजी टाटा यांच्या औद्योगिक क्रांतीचा कार्यकाळ व त्याचा इतिहास माहितीपटातून मांडण्यात आला आहे. प्रदर्शनाला भेट देणार्या विद्यार्थ्यांना भेट वस्तु दिली जात असून प्रदर्शनावर प्रश्न मंजुषेतील विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात येत आहे.
माथेरानमध्ये जमशेदजींच्या कार्यशैलीला उजाळा

Indian industrialist Jamsetji Nusserwanji Tata (1839 - 1904), founder of Indian multinational corporation the Tata Group, circa 1890. (Photo by Henry Guttmann/Hulton Archive/Getty Images)