| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये आजारी पडलेल्या माकडाला तातडीने इलाज मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचविण्यात वन विभाग आणि पशु संवर्धन विभाग याना यश आले आहे. याबाबतची खबर वनविभागाचे वनपाल राजेश आडे याना मिळाली. त्यांनी तात्काळ वनरक्षक आणि वनमजूर यांना त्या ठिकाणी पाठवून वन विभागाच्या कार्यालयात आणले व पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी अमोल कांबळे याना त्याच्यावर उपचार करण्यासाठी सांगितले. त्यांनी माकडाला तपासून औषधोपचार सुरू केले.सलाईनमधून इंजेक्शन देऊन त्याला चार दिवस वन विभागाच्या देखरेखीत ठेवला.चार दिवसानंतर तो पूर्णपणे ठणठणीत झाल्यावर त्याला अधिवासात सोडून देण्यात आल्याची माहिती वनपाल राजेश आडे यांनी दिली.