वातावरणबदलाचा आरोग्यावर परिणाम

| तळा | वार्ताहर |

बदलत्या वातावरणाचा मानवी जीवनावर परिणाम झाल्याने आजाराच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत, त्यामुळे दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळते. बदलत्या वातावरणात दिवसा प्रचंड उष्णता वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. दिवसा तापमान 34 ते 36 डिग्रीवर पोहोचत असल्याने सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, दमा लागणे, शिंका येणे, श्‍वसनाचे आजार अशा अनेक आजारांनी डोके वर काढले आहेत. त्यामुळे अगदी लहान बालकांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना या आजारांची लागण झाली आहे.

Exit mobile version