| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
लघुशंकेसाठी गेलेल्या अमोल पैठणे यांचा रेल्वे ट्रॅकवर अपघात झाला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे रेल्वे ट्रॅक परिसरात सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल महानगर सचिव पराग बालड यांनी रेल्वे व्यवस्थापक, पनवेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
रेल्वे ट्रॅक वरील अपघात रोखण्यासाठी त्या ठिकाणी बॅरिगेट लावण्यात यावे यासाठी पनवेल मनसेच्या वतीने पनवेल रेल्वे व्यवस्थापक यांना निवेदन देऊन पराग बालड यांनी मागणी केली. 30 एप्रिल रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास बालभारती ते सीएनजी पंप असलेल्या दरम्यान रेल्वे अंडरपासजवळ रेल्वे क्रॉसिंग ब्रिजच्या बाजूला असलेल्या दुकानाच वीज पुरवठा संदर्भातील तक्रारीसाठी अमोल पैठणे गेले होते. यावेळी तक्रार निवारण केल्यानंतर ते लघुशंकेसाठी गेले असता त्यांचा अपघात झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. यापूर्वीही त्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. संरक्षित कुंपण नसल्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी आणि भविष्यात होणारी दुर्घटना टाळावी यासाठी मनसेने पत्रव्यवहार केला आहे. यावेळी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
‘रेल्वे ट्रॅक परिसरात सुरक्षा उपाययोजना करा’
