ठाणे | प्रतिनिधी |
ठाण्यामधील राबोडीमध्ये एका धोकादायक इमारतीला स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू झालाय. रविवारी सकाळी (12 सप्टेंबर ) खत्री अपार्टमेंट या धोकादायक इमारतीचा तिसर्या मजल्यावरील तसेच पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने तीन रहिवाशी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा समावेश असून त्याचीच प्रकृती चिंताजनक आहे. सध्या या 75 जणांना तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.