मालकाच्या कृत्याने ग्रामस्थ भयभीत
मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीतील विहूर रौद परिसरात तणावाचे वातावरण असताना शनिवार रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी येथील मालकाने स्वतःच्या मर्जीने द्रोणचा वापर करून तो त्याच्या जागेशिवाय इतर जागेत सुद्धा फिरवल्याने येथील ग्रामस्थ भयग्रस्त झाले आहेत.याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली,मात्र त्यांनी लेखी तक्रारीनंतरच चौकशी केली जाईल,असे सूचित केले.
सरकारी गुरुचरण असलेली जागा खाजगी मालकाने विकत घेतल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व मालकांमध्ये वाद निर्माण होऊन येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सदरचा खाजगी मालक हा खूप श्रीमंत असल्याने त्याने गावकर्यांचा विरोध मोडून तीन दिवस पोलीस संरक्षण घेऊन जलद गतीने संरक्षक काम पूर्ण केले होते. आता शांतता असतानाच अचानक पणे द्रोण वापरून ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण केली जात आहे.
सरकारी नियमांची ऐशीतैशी
याबाबत विहूर ग्रामस्थांनी सांगितले की, ताबा घेणार्या तैजून यांच्या हस्तकाने ग्रामस्थांना चिथावणी देण्यासाठी अक्षरशः गावातील घरावर काही वेळ ड्रोन उडवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.नागरी उड्डाण मंत्रालयांनी ड्रोन उडवण्यासंबंधी काही नियमावली जाहीर केली आहे. नियम मोडल्यास लाखो रुपयाचा दंड वसूल करण्याची तरतूद आहे.सर्व नियम विहूर जनतेनेच पाळायचे काय असा संतप्त प्रश्न सध्या विहूर ग्रामस्थांनी केला आहे.
शनिवारी जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा लगेचच ग्रामस्थांन मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना बेकायदेशीर ड्रोन उडवल्याची खबर दिली. पहिला खोट्या सहीचा प्रकरण आता ड्रोन प्रकरण राजकीय वरदहस्त असल्यामुळे सर्व प्रकरणे दाबली जात आहेत.असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी मला तोंडी कल्पना दिली आहे. तक्रार अर्ज आल्यावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.
परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक