जिल्ह्यात 17 लाख 381 मतदार बजावणार हक्क

युवा, महिला व 85 वर्षांवरील मतदारांची भूमिका ठरणार महत्त्वपूर्ण

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 7) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 17 लाख 381 मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक मतदार पनवेल तालुक्यात, तर सर्वात कमी मतदार तळा तालुक्यात आहेत. जिल्ह्यातील 2 हजार 323 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ती सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी दोन हजारांहून अधिक कर्मचारी व कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. युवा, महिला आणि 85 वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या 59 व पंचायत समितीच्या 118 जागांसाठी ही निवडणूक होत असून, एकूण 502 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे 173 व पंचायत समितीचे 329 उमेदवार आहेत. गुरुवारी रात्री प्रचार सभा संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मतदानाकडे लागले आहे.

मतदान शनिवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार आहे. 17 लाख 381 मतदारांमध्ये 8 लाख 57 हजार नऊ महिला, 8 लाख 46 हजार 347 पुरुष व इतर 25 मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 2 हजार 323 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, नेमणूक केलेले कर्मचारी सकाळपासून केंद्रांकडे रवाना झाले आहेत. प्रत्येक केंद्रावर पोलिसांसह सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचारी व साहित्य वाहतुकीसाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मेडिकल किट व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वीस हजारांहून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी सुमारे साडे आठ हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध असून, त्यामध्ये 2 हजार 500 कंट्रोल युनिट व 5 हजार 950 बॅलेट युनिट मशीनचा समावेश आहे.

कर्मचारी केंद्राकडे रवाना
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, नियुक्त कर्मचारी शुक्रवारी सकाळपासून मतदान केंद्रांकडे रवाना झाले. ईव्हीएम मशीन व आवश्यक साहित्य घेऊन कर्मचारी केंद्रांवर पोहोचत होते. महिलांसाठी शक्य तितकी जवळची मतदान केंद्रे देण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
185 एसटी बसेसचा वापर
कर्मचारी व साहित्य वाहतुकीसाठी दोन दिवसांत रायगड जिल्ह्यातून 185 एसटी बसेसचा वापर करण्यात येत आहे. सहा फेब्रुवारीला केंद्रांवर कर्मचारी पोहोचवण्यासाठी आणि सात फेब्रुवारीला मतदानानंतर परत आणण्यासाठी बसची मदत घेतली जात आहे. अलिबाग आगारातून 32, महाड 30, पेण 30, श्रीवर्धन 20, कर्जत 9, रोहा 30, मुरुड 11, माणगाव 23 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे काही नियमित फेऱ्या रद्द होण्याची शक्यता असून, प्रवाशांना त्रास होऊ शकतो. पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाने दिली आहे. शाळा बंद असल्याने शालेय फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
भयमुक्त वातावरणात मतदान करा
मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व सीआयएसएफ जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले.

जि.प., पं.स. मतदार संख्येवर दृष्टीक्षेप

तालुकेजि.प.गटपं. स. गणमतदारकेंद्र
पनवेल –8162,79,776346
कर्जत – 6121,70,702220
खालापूर- 481,10,982144
सुधागड-2453,99875
पेण – 510 1,39,479190
उरण – 481,08,520135
अलिबाग –7142,01,923261
मुरुड – 2455,55281
रोहा – 481,28,763194
तळा – 2432,12252
माणगाव –48 1,39,519206
म्हसळा – 2443,53169
श्रीवर्धन – 2456,82680
महाड – 5101,39446203
पोलादपूर – 2439,24267
एकूण – 5911817,00,3812323


Exit mobile version