मनमेश्‍वर शिवमंदीराचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम उत्साहात

। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे जंगम वाडी येथील प्राचीन मनमेश्‍वर शिवमंदिर जिर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि नुतन मंदिर उद्घाटन सोहळा सद्गुरू नीलकंठ शिवाचार्य धारेश्‍वर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी भक्तगणांना मार्गदर्शन करताना सद्गुरू नीलकंठ शिवाचार्य धारेश्‍वर महाराजांनी सांगितले की, शीवैक्य सुरेश स्वामी यांनी तोंडसुरे जंगम वाडी गावाला योग्य आकार दिला. समाजासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, या प्राचीन शिवमंदिराचा जीर्णोद्धार व्हावा ही त्यांची शेवटपर्यंत तळमळ होती, ती तळमळ आज पूर्णत्वास जात असल्याचे खरेखूरे समाधान भासत असून या रूपाने त्यांची आठवण निश्‍चितपणे अजरामर राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


याप्रसंगी अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ तोंडसुरे जंगमवाडी मलिकांत जंगम, खास. सुनिल तटकरे, उद्योगपती प्रफुल गवळी, आखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ कार्याध्यक्ष डॉ. विजय स्वामी जंगम, मीरा भाईंदर विरोधी पक्षनेते लक्षुमण जंगम, भाजपा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख कृष्णा कोबनाक, दक्षिण रायगड शिवसेना प्रमुख अनिल नवगणे, विशाल सायकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समिर बनकर, गोपाळ भायदे, सखाराम पवार, भिवलिंग स्वामी जंगम, वेदमूर्ती देवलिंग स्वामी जंगम, महिला आघाडी प्रमुख आ. भा. वीरशैव लिंगायत महासंघ विद्या जंगम, सुरेश जंगम, मोरेश्‍वर जंगम, संजय जंगम, शिवपर्वती महिला मंडळ अध्यक्षा वर्षा जंगम, रुपाली जंगम, अनिल जंगम आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version