। म्हसळा । वार्ताहर ।
सह्याद्रीचे शिलेदार युवा ट्रेकर्स ग्रुप मुंबई यांच्यातर्फे भारताचा 78वा स्वातंत्र्यदिन सोहळा किल्ले भास्करगडावर साजरा करण्यात आला. यावेळी 78 फूट तिरंगा फडकवून छञपत्ती शिवाजी महाराजांना मानवदंना देण्यात आली. भास्करगड किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये ञ्यंबक डोंगर रांगेत असून समुद्री सपाटी पासुन 3 हजार 500 फुट ऊंचीवर आहे. भास्करगडावरून दिसणारा प्रदेश मात्र निखालस सुंदर आहे. गडमाथ्यावरून समोरच फणीचा डोंगर, हरिहर किल्ला, ब्रह्मा डोंगर, कापड्या डोंगर, ब्रह्मगिरी, अंजनेरी किल्ला तसेच वैतरणा धरणाचा विस्तीर्ण परिसर पहावयला मिळतो.
या कार्यक्रमाचे नियोजन म्हसळा येथील अमोल परशुराम देवे आणि प्रशांत धोकटे यांनी केले होते. या मोहीमेत सहभागी झालेले दुर्ग मिञ निलेश धोकटे, प्रतिक पालशेतकर, योगेश शर्मा, तेजश महाडीक, प्राजक्ता महाडीक, हर्षदा माचीवले, भरत भुवड, प्रियेश रेवाळे, प्रियेश धोकटे आणि ग्रुप मधील सर्वात छोटा युवा ट्रेकर्स प्रियंक शर्मा मोहीमेत सहभागी झाले होते. चहा,नास्ता आणि राहण्याची व्यवस्था भास्करगडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाडा या गावातील रहिवाशी श्रवण वड यांनी केली होती. त्यांचे युवा ट्रेकर्स ग्रुपने आभार व्यक्त केले.