| म्हसळा | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनोटी या शाळेत म्हसळा तालुक्याचे पोलीस ठाण्याचे तालुका पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांजवळ संवाद साधला.
संदीप कहाळे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने शिस्तप्रिय वागले पाहिजे, वरिष्ठांचा आदरयुक्त सन्मान केला पाहिजे, शिक्षण घेऊन तुम्ही भविष्यात काय होणार या मुद्द्यावर प्रश्नोत्तरेचा भाग घेतल्याने विद्यार्थ्यांनी धीटपणे उत्तरे दिली. या श्री. कहाळे यांनी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
शाळा स्तरावर घेण्यात येणारे विविध उपक्रमांचे कहाळे यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मनापासून कौतुक केले. यावेळी रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुलींनी पोलीस निरीक्षक कहाळे व सहकारी पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम यशस्वी केला. तसेच स्काऊट व गाईड प्रमाणपत्रे प्राप्त विद्यार्थ्यांचा उपस्थित पोलीस अधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आणि तालुका स्तरावर चमकलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी बनोटी शाळेला भेट देण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, पीएसआय सुनील रोहिणकर, पोलीस हवालदार नितीन शिर्के, संतोष चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक जयसिंग बेटकर, सहकारी शिक्षक रामेश्वर गायकवाड, पालक कल्याणी कांबळे, नीलम कांबळे, प्रभावती कांबळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बेटकर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन रामेश्वर गायकवाड यांनी केले.