| अलिबाग | वार्ताहर
भिलजी गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. ही बाब शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या निदर्शनास येताच शेकापच्या माध्यमातून भिलजी गावात तीन स्टँड पोस्ट आणि शेडचे उद्घाटन करण्यात आले. गावातील पाणी समस्या दूर झाल्यामुळे महिलांकडून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.