| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमधील मसाले उद्योगात सुप्रसिद्ध असलेले पोटे मसाले यांचे संस्थापक हरिभाऊ पोटे यांच्या वयाच्या 87 व्या वर्षी त्यांच्या हस्ते शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटी येथे नव्याने अत्याधुनिक पद्धतीने सुरु करण्यात आलेल्या हाय फिटनेस स्टुडिओ जिमचे उद्घाटन पोटे कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. हरिभाऊ पोटे यांच्या हस्तेच जिमचे उद्घाटन करण्याचा आग्रह प्रशांत खुटले यांनी धरला होता व तो आज त्यांनी पूर्ण केला.
प्रशांत खुटले यांनी श्री सहाय्य ओझोन या इमारतीमध्ये हाय फिटनेस स्टुडिओ जिम उभारली असून, दोन मजल्यावर अत्याधुनिक पद्धतीने ही जिम सुरु केली आहे. यावेळी हरिभाऊ पोटे यांनी शुभेच्छा देताना तरुण पिढीनेसुद्धा व्यायामाची आवड अंगीकारली पाहिजे तसेच नियमित व्यायाम हा केला पाहिजे, आजही वयाच्या 87 व्या वर्षी मी दररोज अडीच तास चालतो, असे उद्घाटक हरिभाऊ पोटे यांनी सांगितले.
याप्रसंगी उद्योजक विनायक पोटे, आर्किटेक दिनेश नाईक, अनिल ठक्कर, पंकज धारोड, पनवेलमधील श्री मेडिकलचे व वेलनेस फॉरेव्हर वरचे पाटर्नर शिषिर नार्वेकर व पोटे कुटुंबीय उपस्थित होते.