। उरण । वार्ताहर ।
उरण मधील विधीतज्ञ शेखर पाटील यांच्या विद्या अकॅडमीचे उद्घाटन उरणपंचायत समितीचे माजी सभापती अॅड. सागर कडू यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना सागर कडू यांनी शेखर पाटील यांचे विशेष कौतुक केले आहेत. त्याचबरोबर पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी देखील विद्या अकॅडमीला शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रामादरम्यान माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, माजी जि.प. सदस्य चारुदत्त पाटील, शेकाप महिला आघाडी अध्यक्षा सीमा घरत, ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र नाईक, शेकापचे सहचिटणीस यशवंत ठाकूर यांनी शेखर पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छापर भाषणे केली. या कार्यक्रमासाठी प्रदीप नाखवा, अॅड. श्रीधर कवडे, अॅड. ममता पाटील, नयन म्हात्रे, फेडरेशनचे सचिव वाघ, संचालक डी.डी. केणी, महेंद्र कुडतरकर, रवी पाटील, दीनानाथ ठाकूर, रमेश म्हात्रे, संतोष पवार, अॅड. विनायक खेतल, लता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.