। रेवदंडा । प्रतिनिधी ।
जेएसडब्लू लिमिटेड साळावमध्ये 54 वा राष्ट्रीय सुरक्षा दिन मंगळवारी (दि.4) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या फायर अँड सेफ्टी विभागाच्यावतीने महिनाभर प्रकल्पातील कर्मचारी, कंत्राटी कामगार, त्यांचे कुटूंबिय यांच्यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये भिंती पत्रके, प्रश्न मंजूषा, घोष वाक्य स्पर्धा यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस साळाव जेएसडब्लू फायर अँड सेफ्टीचे प्रबंधक योगेश वासनिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख अतिथी साळाव जेएसडब्ल्यू कंपनी मुख्य पंकज मलिक यांचे हस्ते राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचे औचित्याने ध्वज फडकविण्यात आला. यावेळी पंकज मलिक यांनी उपस्थित अधिकारीवर्ग, कर्मचारीवर्ग व कंत्राटी कामगार यांना सुरक्षा विषयक शपथ दिली. त्यानंतर फायर अॅण्ड सेफ्टी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे यश मिळविलेल्यांचा भेटवस्तू प्रदान करून उपस्थित मान्यवराचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला साळाव जेएसडब्ल्यू कंपनीचे मुख्य पंकज मलिक, सुरक्षा प्रमुख निशांत संकाळे, वरिष्ठ अधिकारी सुनिल लोणकर, अजीत आठवले, जितेंंद आचार्य, फायर अँड सेफ्टी प्रंबधक योगेश वासनिक, उपप्रबधंक अभिषेक कुलक्षेंत्रा आदी उपस्थित होते.