देशात कोरोना रुग्णात वाढ

केरळने वाढवली चिंता
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात गेल्या 24 तासात भारतात 11 हजार 271 नवे रुग्ण आढळले असून 285 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिलासा देणारी बाब म्हणजे सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 918 इतकी आहे. देशातील नव्या रुग्णसंख्येत एकट्या केरळमधील 6 हजार 468 रुग्ण आहेत.
एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 44 लाख 37 हजार 307 इथकी झाली आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून 1 लाख 35 हजार 918 इतकी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 63 हजार 530 झाली आहे. आतापर्यंत 3 कोटी 38 लाख 37 हजार 589 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनावर देशव्यापी लसीकरण मोहिम सुरु आहे. आतापर्यंत 112 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 57 लाख 43 हजार 840 जणांना शनिवारी लस देण्यात आली आहे. एकूण 112 कोटी 1 लाख 3 हजार 225 डोस देण्यात आले आहेत. देशात केरळने चिंता वाढवली आहे. राज्यात दिवसभरात 6 हजार 468 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 50 लाख 55 हजार 224 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 35 हजार 685 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 68 हजार 630 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version