आधुनिकीकरणामुळे जेएनपीटीच्या उत्पन्नात वाढ

गेट ऑटोमेशनपासून इंटर टर्मिनल ट्रान्स्फर सीस्टिमची सुविधा
। उरण । वार्ताहर ।
जेएनपीटीने ईझ ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत बंदरामधील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. सर्व कामांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. गेट ऑटोमेशनसह सर्व टर्मिनल्सला जोडणारी इंटर टर्मिनल ट्रान्सफर सीस्टिम विकसित केली आहे. त्यामुळे जेएनपीटीच्या उत्पन्नात दिवसागणिक वाढत होत आहे.
निर्यात कंटेनरसाठी थेट पोर्टमध्ये प्रवेश, थेट पोर्ट डिलीव्हरीसह आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे जेएनपीटी बंदराच्या कामकाजामध्ये सुधारणा होऊन उत्पन्नामध्येही वाढ होऊ लागली आहे. मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी शासनाने 1989 मध्ये जेएनपीटी बंदर विकसित केले. तब्बल 2987 हेक्टर जमिनीवरील हे बंदर सद्य:स्थितीमध्ये देशातील प्रमुख मालवाहतुकीचे केंद्र बनले आहे. 2021 मध्ये येथून 76.14 दशलक्ष मालाची हाताळणी झाली होती. बंदराचे उत्पन्न 1922 कोटींवर पोहोचले होते. यावर्षी विक्रमी उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू
जेएनपीटीचे सेझ सह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु आहेत. 65 हजार कोटी रुपयांचा वाढवन प्रकल्प पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटीच्या भागीदारीत चौथे कंटेनर टर्मिनल विकसित केने जात असून, त्यामध्ये आठ हजार कोटींची गुंतवणूक असणार आहे. यामधील 2.4 दशलक्ष टीईयू मालवाहतूक क्षमतेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 20 दशलक्ष टीईयू मालवाहतूक करता येणार आहे. लिक्विड जेट्टीसाठी 182 कोटी, रस्ते रस्ते रुढीकरणासह इतर कामासाठी तीन हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
ड्रायपोर्ट विकसित करणार
रेल्वे आणि रोडवाहतुकीच्या माध्यमातून बदराची अंतर्देशीय कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी इंडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर व बदराकडे जाणार्‍या रोडचे रुंदीकरण केले जात आहे. याशिवाय कार्यो क्लिअरन्स व एकत्रिकरणासाठी जालना, वर्धा, नाशिक आणि सांगली यासारख्या महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात हब एंड स्पोक मॉडेलवर आधारित द्वाय पोर्ट विकसित केला जाणार आहे.

Exit mobile version