धक्कादायक! आरवली गृहसंकुलात अल्पवयीन मुलीसमोर अश्लील चाळे

पॉस्को खाली नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। नेरळ । वार्ताहर ।

नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील शेलू गावात आरवली संकुल हि गृहनिर्माण संस्था आहे. त्या संस्थेतील राहत्या घराच्या गॅलरी मधील लहान बालिकेसमोर लैंगिक चाळे करण्याची घटना घडली आहे. लहान मुलीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सदर व्यक्ती वेगवेगळी आमिषे दाखवत होता. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर पॉस्को खाली गुन्हा नेरळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत शेलू गावात आरवली संकुल हि ग्रह निर्माण संस्था आहे. त्या ठिकाणी काही इमारतींचा प्रकल्प असून तेथे एक नऊ वर्षाची मुलगी हिच्या समोर तेथेच समोरच्या इमारतीत राहणार व्यक्ती वेगेवगेळ्या प्रकारे आलोभाने दाखवून मनात लज्जा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा त्या लहान मुलीच्या मनात लज्जा निर्माण करण्यासाठी करीत असलेले चाळे याची माहिती त्या अल्पवयीन मुलीच्या पॅकलंकांना समजली असता त्यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठून संबंधित व्यक्तीबद्दल गुन्हा दाखल केला.याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 273/2022 भा.दं.वि.क. 509 , बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम, 2012 चे कलम 12 प्रमाणे पॉस्को खाली गुन्हा दाखल केला आहे.अल्पवयीन मुलीची व्यक्तीला नेरळ पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी अटक केली असून या घटनेचा तपास पोसई.जाधव हे करीत आहेत.

Exit mobile version